Breaking News

फलटण मधील विकास कामांसाठी श्रीमंत रामराजे यांच्या प्रयत्नाने २० कोटी रुपयांचा निधी मंजूर

A fund of Rs. 20 crores was approved for the development works in Phaltan through the efforts of Shrimant Ramraje Naik Nimbalkar

फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  -  विधानपरिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नाने फलटण शहरातील विविध विकास कामांसाठी राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत  २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, अजून ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर होणार असल्याची  माहीती आमदार दिपक चव्हाण यांनी दिली.

     लक्ष्मीविलास पॕलेस येथे  झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार  दिपक चव्हाण  बोलत होते. यावेळी जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर , श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, माजी नगराध्यक्ष पांङूरंग गुंजवटे  यांची प्रमुख   उपस्थिती होती.   

यावेळी बोलताना श्रीमंत संजीवराजे म्हणाले की ,  महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकङून वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत  फलटण नगरपरिषदेस २० कोटी रुपयांच्या   निधी आणि कामे  मंजूर करण्यात आली  आहेत. विधानपरिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी हा निधी आणि कामे  मंजूर केलेली  असून, फलटण शहरातील एकूण ३८ महत्त्वपूर्ण विकासकामे या निधी मुळे मार्गी लागणार आहेत.

मंजूर झालेल्या निधीमधून पुढील कामे पुढील विकास कामे करण्यात येणार आहेत. १) कृषिराज कॉलनी येथे सिमेंट काँक्रीट रस्ता करणे २) महतपुरा पेठ - शंभूराज कदम घर ते करणे घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ३) महतपुरा पेठ - साईबाबा मंदिर स्वागत कमान रोड ते बर्गे गॅरेज रस्ता करणे ४) महतपुरा पेठ -  उदय मांढरे घर ते प्रवीण घनवट घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे 

५) प्रभाग क्रमांक १२ मुक्ती अंगण अपार्टमेंट ते एल बी कदम घर रस्ता करणे व संरक्षक भिंत बांधणे ६) प्रभाग क्रमांक १२ लक्ष्मी नगर नवीन सुविधा हॉस्पिटल येथे रस्ता करणे ७) प्रभाग क्रमांक १२ भोरी मज्जिद ते मुक्ती अंगण अपार्टमेंट ते एल बी कदम घरापर्यंत चार इंची पाण्याची वितरण नलिका बसवणे. ८) प्रभाग क्रमांक १२ सहारा साडी सेंटर ते निंबाळकर घरापर्यंत पाण्याची वितरण नलिका बसवणे ९) हडको वसाहत अंतर्गत लादीकरण करणे १०) महाराजा मंगल कार्यालय परिसर कदम घर ते फिरोज बागवान प्लॉटपर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 

११) प्रभाग क्रमांक १० दिलीप पवार घर ते नाथ मंदिर पाण्याची वितरण नलिका बसवणे १२) प्रभाग क्रमांक १० हनुमान नगर काळोखे वस्ती पाण्याची वितरण नलिका बसवणे  १३) प्रभाग क्रमांक १० अहिंसा मैदान लगतचा रस्ता सिमेंट काँक्रीट करणे १४) प्रभाग क्रमांक १० मंगलताई मठासमोर समोरील परिसर सिमेंट काँक्रीट करणे १५) प्रभाग क्रमांक १० डॉ. राजवैद्य ते बाजार घरासमोरील परिसर सिमेंट काँक्रीट करणे १६) प्रभाग क्रमांक १० सम्राट जनरल स्टोअर शेजारील परिसर सिमेंट काँक्रीट करणे १७) प्रभाग क्रमांक १० संत बापूतास नगर कमान करणे

१८)  प्रभाग क्रमांक ८ करणे घर ते खडकहिरा  ओढा पर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 

१९) पद्मावती नगर स्वरा कॉर्नर ते शशिकांत थोरात घरापर्यंत तीन इंची व्यासाची पिण्याच्या पाण्याची वितरण नलिका बसवणे २०) पद्मावती अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करणे 

२१) प्रभाग क्रमांक ६ शनिनगर बानगंगा नदी संरक्षक भिंत बांधणे २२) उमाजी नाईक चौक परिसर मेटकरी गल्ली परिसर पवार गल्ली परिसर पेविंग लादिकरण करणे तसेच गटरकरीता सिमेंट पाईप बसवणे 

२३) प्रभाग क्रमांक ९ अविनाश चोरमले घर ते समशेर शेख घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे २४) प्रभाग क्रमांक ९ कोळपे घर ते रामदास निकम घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे २५) प्रभाग क्रमांक ९ कोळपे घर ते नेताजी चोरमले घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे २६) प्रभाग क्रमांक ९ बेडके घर ते रामभाऊ जगताप घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे २७) प्रभाग क्रमांक ९ अहिवळे घर ते फडतरे घरापर्यंत सिमेंट काँक्रीट करणे २८) प्रभाग क्रमांक ९ शिवाजी रोड येथील अंतर्गत बोळे काँक्रिटीकरण करणे २९) प्रभाग क्रमांक ९ पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर समाज मंदिराच्या परिसरामध्ये पेविंग ब्लॉक बसवणे ३०) प्रभाग क्रमांक ९ अतुल कोठडीया ते मदने घर अंतर्गत बोळे काँक्रिटीकरण करणे ३१) प्रभाग क्रमांक ९ पवार घर ते मलानी घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे ३२) प्रभाग क्रमांक ९ बर्गे घर ते जाधव घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे ३३) प्रभाग क्रमांक ९ रवींद्र बेडकिहाळ घर ते कांबळे घरापर्यंत सिमेंट काँक्रीट करणे

३४) गोळीबार मैदान येथे पाण्याची उंच टाकी बांधणे ३५) बारवबाग येथे पाण्याची उंच टाकी बांधणे ३६) सुधारित जलकेंद्र ते गिरवी नाका मेन रायझिंग ५० एचपी मोटर खरेदी करून बसवणे ३७) प्रभाग क्रमांक ६ ब्राह्मण गल्ली येथील डीपी शिप्ट करणे ३८) दत्त मंदिर ते नेहरू चौक ते कॉलेज रोड दत्त मंदिर रस्ता करणे.

No comments