Breaking News

मलवडीचे सरपंच बाजीराव तरडे यांचा खा. रणजितसिंह यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

Malvadi Sarpanch Bajirao Tarde joined BJP in the presence of  MP Ranjitsinh Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१० - मलवडी ग्रामपंचायतचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरपंच बाजीराव तरडे यांचा व ग्रामपंचायत उपसरपंच ज्ञानदेव टकले व इतर सदस्य व सोसायटी चे चेअरमन नानासो बिचकुले व शशीकांत टकले सदस्य दादा कारंडे, हरिदास तरडे ,आगतराव तरडे, राहुल गायकवाड, सतिश कारंडे, गणेश भोसले, दिपक तरडे ,किरण कारंडे यांचा खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश झाला. यावेळी युवा नेते धनंजयदादा साळुंखे पाटील, जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, विधानसभा प्रमुख सचिन कांबळे पाटील , किसान मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष सुशांत निंबाळकर उपस्थित होते.

     यावेळी बोलताना खा. रणजितसिह नाईक निंबाळकर म्हणाले की, मलवडी गावाच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही, भविष्यात युवकांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच युवकांसाठी लवकरच अद्यावत व्यायाम शाळा उभारणार आहे.  गावातील जमीन धोम बलकवडी प्रकल्पात गेली आहे, परंतु अद्याप  शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले. 

    गावातील कार्यकर्ते नी आम्ही आगामी लोकसभा निवडणुकीत खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी रामभाऊ नरूटे पाटील, धनाजी टकले, बबन रिटे, सचिन बरकडे, विनायक बरकडे, श्रीरग बिचकुले, मारूती सुळ, राजेंद्र रूपनवर महाराज, अनिल तरटे , सचिन बरकडे, उपस्थित होते.

No comments