Breaking News

एमएच ५३ - फलटणला नवीन आरटीओ ऑफिस ; खा.रणजितसिंह यांच्या प्रयत्नांना यश

MH 53 - New RTO Office at Phaltan; Success to MP Ranjit Singh's efforts

फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.६ - खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या  प्रयत्नातून फलटण येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास मंजुरी मिळाली होती. आज त्याप्रमाणे शासन निर्णय होऊन फलटणला स्वतंत्र असा एम एच 53 हा स्वतंत्र नंबर मिळाला आहे. राज्य शासनाने आज शासन निर्णय करून फलटणला भाडेतत्त्वावर किंवा शासनाची मालकीची जागा घेऊन, ताबडतोब हे कार्यालय सुरू करावे असे आदेश दिले आहेत.

 फलटणच्या जनतेने बऱ्याच वर्षापासून पाहिलेलं स्वप्न खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पूर्ण केल्यामुळे सातारला वाहनांची नोंदणी, ड्राइव्हिंग लायसन्स कामासाठी व वाहनधारकांना किंवा आरटीओ एजंट यांना आता सातारा येथे जावे लागणार नाही. त्यामुळे वेळेची व पैशाची बचत होणार आहे. खासदार रणजितसिह  नाईक निंबाळकर यांनी फलटणची अनेक प्रलंबित कामे  पूर्ण केली असून त्यामुळे नागरिकांच्यामध्ये समाधनाचे वातावरण आहे.  

No comments