Breaking News

खा. रणजितसिंह व आरटीओ अधिकाऱ्यांनी केली फलटण आरटीओ कार्यालयाच्या जागेची पाहणी

MP Ranjitsinh and RTO officials inspected the premises of Phaltan RTO office

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१२ - फलटण तालुक्यातील जनतेला वाहन नोंदणी, वाहन परवाना कामानिमित्त सातारा येथे जावे लागत होते. त्यामुळे फलटण तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचा खर्च व वेळ जात होता, तसेच त्रासही होत होता, याची दखल घेऊन, माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण येथे आरटीओ कार्यालय मंजूर करून आणले. आज खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण येथे नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) साठी, जुने लेडीज होस्टेल इमारत, शिंगणापूर रोड, शिवाजीनगर, फलटण येथे जागा उपलब्ध करून, सातारा आरटीओ कार्यालयातील सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. संदीप म्हेत्रे, मोटार वाहन निरीक्षक योगेश ओतारी, सहायक मोटर वाहन निरीक्षक विशाल थोरात या अधिकाऱ्यांसमवेत जागेची पाहणी केली व लवकरच नवीन कार्यालय बांधण्यासाठी साधारण तीन एकर जागा उपलब्ध करून देण्यात येईल व आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल असेही खा. रणजितसिंह यांनी बोलताना अधिकाऱ्यांना सांगितले.

        यावेळी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments