Breaking News

नोटरीपदी नियुक्ती झालेल्या मुस्लिम वकिलांचा मुस्लिम समाजातर्फे सत्कार

Muslim lawyers appointed as notaries are felicitated by the Muslim community

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा)  - भारत सरकार नोटरी या पदी फलटणमधील  ॲड. जावेदभाई मेटकरी, ॲड. अजित पठाण, ॲड. दस्तगीर शेख, ॲड. मुराद इनामदार, ॲड. इम्रान तांबोळी, ॲड. समीर शेख, ॲड. यास्मिन मेटकरी यांची निवड झाल्याबद्दल मुस्लिम समाजातर्फे त्यांचा पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जमशेदभाई पठाण यांनी केले. त्यांनी सांगताना असे सांगितले की गेले ५० वर्ष मुस्लिम समाजातील वकिलांना नोटरी पद मिळालेले नाही, ते आज रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये फलटण मधील मुस्लिम समाजातील सात वकिलांना भारत सरकार नोटरी म्हणून निवड झाली, याबद्दल समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे,तसेच ॲड. जावेदभाई मेटकरी यांनी फलटण वकील संघाचे अध्यक्ष पद   भूषविले होते,  तसेच आज ॲड. अजित पठाण हे फलटण वकील संघाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या कारकीर्दीमध्ये फलटणमध्ये जिल्ह्याचं न्यायालय झालं असल्याचे नमूद केले.

    सामाजिक कार्यकर्ते आमिरभाई शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, निवड झालेल्यांचे अभिनंदन करत, खऱ्या अर्थाने नोटरी पदी निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. 

    यावेळी मेहबूबभाई मेटकरी, पप्पूभाई शेख, अमीरभाई शेख, सलीम मेटकरी, रफिक शेख,  जावेदभाई शेख, रज्जूभाई बागवान, आसिफभाई मजेखान मेटकरी,  शाकीरभाई महात, सलीम तांबोळी, मुबारक भाई मेटकरी, हमीद भाई शेख, शाहरुख शेख, आरिफ भाई शेख व बहुसंख्येने मुस्लिम समाजातील मान्यवर उपस्थित होते. शेवटी जमशेदभाई पठाण यांनी सर्वांचे आभार मानले.

No comments