नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालयास नॅक कमिटीचे 'बी' मानांकन ; भविष्यात विविध अभ्यासक्रम सुरू होणार - सचिन सूर्यवंशी (बेडके)
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२८ - नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालयास राष्ट्रीय मुल्यांकन आणि प्रमाणन परिषद, बंगलोर म्हणजेच नॅक कमिटीचे 'बी' मानांकन मिळाले आहे, त्यामुळे आता भविष्यात महाविद्यालयात नवीन विविध अभ्यासक्रम सुरू करता येणार असून, त्यायोगे विद्यार्थ्यांनाही नवनवीन अभ्यासक्रम नवीन विषय शिकण्याची सुवर्णसंधी मिळणार असल्याची माहिती श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे ऑनररी जनरल सेक्रेटरी डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी बेडके यांनी पत्रकार परिषदेत दिली
विद्यापीठ अनुदान आयोग (UGC), नवी दिल्ली व राष्ट्रीय मुल्यांकन आणि प्रमाणन परिषद, बंगलोर नॅक (NAAC) आणि उच्च व तंत्रशिक्षण महाराष्ट्र शासन यांच्या सुचने नुसार महाराष्ट्र राज्यातील सर्व वरिष्ठ महाविद्यालयांना नॅक, बंगलोर यांचे कडून महाविद्यालयांचे मुल्यांकन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यास अनुसरुन श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटणचे नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालय, फलटण येथे नॅक (NAAC) मुल्यांकनाची प्रक्रिया जून २०२३ पासून सुरु करण्यात आली होती.
नॅक (NAAC) मुल्यांकनाची प्रक्रिया करत असताना मागील पाच वर्षातील नॅक (NAAC) ने ठरवून दिले प्रमाणे सात विविध निकषांची माहिती ठराविक मुदतीमध्ये आवश्यक त्या कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने सादर करावयाची असते. निकषानुसार सर्व माहिती सादर केल्या नंतर त्या माहितीचे राष्ट्रीय स्तरावर तज्ञ व्यक्ति मार्फत मुल्यांकन केले जाते. नंतर नॅक (NAAC) चे त्रिसदस्यीय समिती महाविद्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करत असते.
श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटणचे नामदेवराव सूर्यवंशी(बेडके) महाविद्यालय, फलटण येथे दिनांक १५ आणि १६ मार्च २०२४ रोजी, भक्त कवि नरसिंह मेहता विद्यापीठ, जुनागड गुजरात चे कुलगुरु डॉ. श्री. चेतनकुमार त्रिवेदी व प्रा. डॉ. सौ. उमा गोळे, पंडित रविशंकर शुक्ल विद्यापीठ, रायपूर छत्तीसगड आणि डॉ. श्री. कश्मीर सिंग, प्राचार्य माता गुजरी कॉलेज, फत्तेगडसाहिब पंजाब यांच्या समितीने भेट देऊन महाविद्यालयाच्या कामकाजाची पाहणी केली. व आपला अहवाल राष्ट्रीय मुल्यांकन आणि प्रमाणन परिषद, बंगलोर या शिखर परिषदेकडे सादर केला. या अहवालानुसार आमच्या संस्थेच्या नामदेवराव सूर्यवंशी(बेडके) महाविद्यालयास "बी" हे मानांकन पुढील पाच वर्षाच्या कालवधीसाठी प्राप्त झालेले आहे.
याच समितीच्या भेटी दरम्यान महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय "डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार २०२२ - २०२३" मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे, व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते दि. १२ मार्च २०२४ रोजी श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटण ला सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाले बद्दल नॅक (NAAC) समितीने श्रीराम एज्युकेशन सोसायटी चे अभिनंदन केले.
नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालयास नॅक (NAAC) मानांकन प्राप्त झाल्यामुळे श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण यांना भविष्यकाळात नवीन विविध अभ्यासक्रम सुरू करण्यास संधी मिळणार असून फलटण तालुक्यातील विद्यार्थ्यांना नवनवीन अभ्यासक्रम, नवीन विषय शिकण्याची सुवर्ण संधी मिळणार असून या सुवर्ण संधीचा विद्यार्थ्यांनी आपल्या प्रगतीसाठी व उज्वल भविष्यासाठी उपयोग करुन घ्यावा असे मत संस्थेचे मानद सचिव मा. श्री. डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांनी या वेळी व्यक्त केले.
नॅक (NAAC) मुल्यांकनासाठी नामदेवराव सूर्यवंशी(बेडके) महाविद्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि प्राध्यापकेत्तर कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामकाजाबद्दल श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा मा. श्रीमती सविता सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), संस्थेचे मानद सचिव मा. श्री. डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), संस्थेच्या नियमक मंडाळाचे सदस्य मा. श्री. महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), संस्थेच्या नियमक मंडाळाच्या सदस्या मा. सौ. ज्योती सचिन सूर्यवंशी (बेडके) तसेच संस्थेच्या नियामक मंडळाचे सर्व सदस्य यांनी अभिनंदन करुन महाविद्यालयाच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
No comments