Breaking News

आई बाबा प्लीज मतदान करा...! तडवळे येथील विद्यार्थ्यांचे पत्राद्वारे आवाहन

Parents please vote...! Appeal by letter from students of Tadwale

फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - आपल्या भारताची लोकशाही जगात प्रसिद्ध आहे, लोकशाही जास्तीत जास्त  प्रगल्भ होण्यासाठी आई-बाबा प्लीज तुम्ही आवश्य मतदान करा! असे आवाहन चिमुकल्याने स्वतः पत्र लिहून केले. मतदान जनजागृती कार्यक्रमांअतर्गत  प्राथमिक शाळा जिल्हा परिषद तडवळे ता. फलटण जिल्हा सातारा येथे घेण्यात आला. यावेळी श्री सचिन जाधव स्वीप सहायक अधिकारी फलटण,श्री हेमंत धापटे कृषि सहायक तसेच गेजगे सर व  स्वीप टीम उपस्थित होते.

यावेळी श्री सचिन जाधव यांनी लोकशाहीचा अर्थ सोप्या भाषेत समजून सांगितला त्यानंतर विद्यार्थ्यांनी आनंदाने व अत्यंत उत्सुकतेने पत्र लिहिले, भारताची लोकशाही जगात लोकप्रिय आणि महत्त्वाची आहे, ही लोकशाही अधिक प्रगल्भ होणे गरजेचे आहे, त्यासाठी मतदान करणे गरजेचे आहे, त्यामुळे मी तुम्हाला एक जबाबदार भावी नागरिक या नात्याने मतदान करावे अशी नम्र विनंती पत्रा द्वारे करतो.

  या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मतदान लोकशाही चा अर्थ समजला पत्र लेखनाचा उपक्रम त्यांनी प्रथमच अनुभवला प्रत्यक्ष पोस्ट कार्डवर पत्र लिहिणे हे त्यांच्यासाठी नवीन होते, त्यामुळे सर्व विद्यार्थी वर्ग उत्साहात होते श्री गेजगे सर व शिक्षक यांनी पथकाचे आभार मानले.

  43 माढा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 24 अनुषंगाने 255 फलटण (अ.जा) विधानसभा मतदार संघामध्ये मतदार जनजागृती बाबत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे, तसेच विविध पातळीमध्ये व विविध घटकांमध्ये मतदान जनजागृतीला महत्व देण्यात येत आहे.

No comments