Breaking News

फलटण आरटीओ कार्यालयाचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते आज उद्घाटन



Phaltan RTO office inaugurated by Guardian Minister Shambhu Raje today

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१४ - उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, फलटण जि. सातारा या नुतन कार्यालयाचा उद्घाटन समारंभ राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या शुभहस्ते शुक्रवार दिनांक १५ मार्च २०२४ रोजी दुपारी १ वाजता, शिंगणापूर रोड जुने मुलींचे वस्तीगृह, शिवाजीनगर, फलटण येथे संपन्न होत आहे.

    उद्घाटन समारंभास प्रमुख अतिथी म्हणून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर उपस्थित राहणार आहेत तर या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, आमदार जयंत तासगावकर,आमदार अरुण लाड, आमदार महादेव जानकर, आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण उपस्थित राहणार आहेत. यावेळी विशेष उपस्थिती म्हणून परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य विवेक भीमनवार, सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी सातारा विनोद चव्हाण यांनी केले आहे.

No comments