खा. रणजितसिंह नाईक निंबाळकरांना मोठ्या मताधिक्यानी निवडून देणार - रश्मीताई बागल
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) - माढा लोकसभा मतदारसंघातून विशेषतः करमाळा तालुक्यातून आम्ही सर्व महायुतीचे नेते, कार्यकर्ते, एकत्र येऊन मोठ्या मताधिक्याने खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना यावेळी करमाळा तालुक्यातून लीड देणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाने भारत हा प्रगतशील देश बनला आहे, त्यामुळे लोकसभा मतदारसंघातील सर्व प्रश्न विशेषतः करमाळा तालुक्यातील पाणी प्रश्न रेल्वे, रस्ते हे विषय खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी मार्गी लावले असल्याचे भाजप नेत्या रश्मीताई बागल सांगितले.
करमाळा येथे भारतीय जनता पक्षाच्या नेत्या रश्मीताई बागल यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत रश्मीताई बोलत होत्या. याप्रसंगी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार ,सरचिटणीस गणेश चिवटे , इतर पदाधिकारी उपस्थित होते .
यावेळी बोलताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, मला मिळालेल्या संधीतून मतदार संघातील विकासाच्या दृष्टीने सर्व प्रश्न मी मार्गी लावलेले आहेत, भविष्यात माढा लोकसभा मतदारसंघ हा देशातील एक विकासाचे मॉडेल म्हणून पुढे येईल. उर्वरित सर्व प्रश्न पुढील पाच वर्षांमध्ये मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी खा.रणजितसिंह यांनी यावेळी दिले.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, युवक अध्यक्ष शंभूराजे जगताप, व इतर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.
No comments