...यामुळेच रणजितसिंह पुन्हा एकदा खासदार होतील
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ३० - माढा लोकसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत विजयी होऊन खासदार झालेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मतदार संघातील प्रलंबित कामे करण्याचा धडाका सुरू करून, ती पूर्ण देखील केली. फलटण - लोणंद रेल्वे, फलटण - पंढरपूर रेल्वे मार्ग, फलटण - बारामती रेल्वे मार्ग, निरा देवघर प्रकल्पातील कालव्यांच्या कामास सुरवात, धोम बलकवडी कालवे चार माही वरून आठ माही केले, नाईकबोमवाडी येथे एमआयडीसी मंजूर, फलटण येथे आरटीओ ऑफिस, फलटण येथे जिल्हा सत्र न्यायालय अशी अनेक कामे केल्यामुळेच खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विजयी होऊन, पुन्हा एकदा खासदार होतील अशी चर्चा फलटण परिसरात सुरू आहे.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी निवडुन आल्यानंतर अवघ्या ४० दिवसात फलटणकरांचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण तर केलेच परंतु प्रत्यक्ष फलटण-लोणंद - पुणे रेल्वे सेवाही सप्टेंबर २०१९ ला सुरू केली. फलटण पंढरपूर रेल्वे मार्ग, फलटण बारामती रेल्वे मार्ग यासाठीही प्रयत्न करून बजेटमध्ये १२० कोटी रुपये निधीची तरतूद केली. असुन फलटण-बारामती रेल्वेमार्गाचे दि. १० फेब्रुवारी २०२४ रोजी इन्स्पेक्शन करण्यात आले आहे. त्याचे कामही सुरू करण्यात आले आहे.
निरा देवघर धरणाच्या कालव्यांचे उर्वरित काम त्वरित मार्गी लागण्यासाठी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय जलसंपदा मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेऊन प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी केली. त्यानुसार निरा देवघर पाटबंधारे प्रकल्पास ३९७६ कोटी ८३ लाख रुपयांची तिसरी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्या अनुशंगाने १७ जानेवारी २०२४ रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काळज येथे निरा देवघर कालव्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेतील अडचणी दूर करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिलेले आहेत. देवघर सिंचन प्रकल्प व कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेला लावण्याच्या दृष्टीने केंद्रीय जलसंपदा मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी हवाई पाहणी करावी, अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली होती. त्यानुसार दि. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी केंद्रीय मंत्री शेखावत यांनी निरा देवघर प्रकल्प व कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेची हवाई पाहणी केली. त्या नंतर दोन्ही प्रकल्प मार्गी लागले.
फलटण शहरातील पालखीमार्ग व सुशोभीकरणासाठी ७५ कोटी रुपये निधी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर पीडब्ल्यूडी ऑफिसचे अभियंता यांनी खा.रणजितसिंह यांच्यासह दि.२० फेब्रुवारी २०२४ रोजी फलटण शहरातील पालखी मार्गाचे इन्स्पेक्शन केले. तसेच नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी 'विशेष अनुदान' या योजतेअंतर्गत फलटण नगरपरिषद जि. सातारा करिता रक्कम रु.१५.४५ कोटी निधीला खासदार रणजितसिंह यांच्या प्रयत्नातून मंजूरी देण्यात आली आहे.
फलटण शहर हे रेल्वेमार्ग व राष्ट्रीय महामार्गाद्वारे विकसीत करण्याचा खासदार रणजितसिंह यांचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने माढा मतदारसंघात कित्येक रस्ते विकसित करण्यात आले असून रस्त्यांची कामे सुरू आहेत, त्यामुळेच माढा मतदारसंघात खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर हे पुन्हा एकदा खासदार होती अशी चर्चा सुरू आहे.
No comments