Breaking News

फलटण परिसरात विहिरीत पडलेल्या घोणस व २ नाग या सापांचे जीव वाचवले

Rescued the lives of Ghonas and 2 snakes which fell in the well in Phaltan area

फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.९ - मागील दोन दिवसात फलटण तालुक्यातील चौधरवाडी येथील शेतकरी योगेश नाळे यांच्या विहिरीतून दोन (Indian Spectacled Cobra)भारतीय नाग जातीचे साप तसेच मांडवखडक येथील अमित बनकर यांच्या विहिरीतुन (Russells Viper) घोणस जातीचा साप सुखरुपपणे पकडून   नेचर अँड वाईल्डलाईफ वेल्फेअर सोसायटी,फलटण  (Nature And Wildlife Welfare Society,Phaltan) या संस्थेचे सदस्य अभिजीत जाधव,श्रीनिवास भुजबळ,शुभम फडके,गणेश शिंदे,पंकज पखाले,मनोज पखाले,धीरज भोसले,बोधीसागर निकाळजे यांनी सुखरुपपणे पकडून निसर्गात मुक्त केले. यावेळी नागरिकांना संस्थे तर्फे आवाहन करण्यात आले की सर्व शेतकरीवर्गाने आपल्या विहिरीचे बांधकाम पक्के करावे, जेणेकरुन अश्या दुर्घटना घडू नयेत, तसेच जरी असे वन्यजीव विहिरीमधे पडलेले आढळले तर संस्थेला किंवा वनविभागाला संपर्क करावा. मो. ७५८८५३२०२३.

No comments