Breaking News

जिम्नॅशियम हॉल, स्विमिंग पूल, रस्ते, अंगणवाडी, शाळा, मत्सालय, हॉस्पिटलसह ३९ कामांसाठी खा. रणजितसिंह यांच्या प्रयत्नाने १५.४५ कोटींचा निधी मंजूर

Rs 15.45 crore sanctioned for development works in Phaltan due to MP Ranjitsinh's efforts

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१६ - नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान" या योजतेअंतर्गत फलटण नगरपरिषद जि. सातारा करिता रक्कम रु.१५.४५ कोटी व  म्हसवड नगरपंचायत जि. सातारा करिता रक्कम रु.०.२० कोटी असे एकूण रक्कम रु.१५,६५,००,०००/-  इतक्या निधीला खासदार रणजितसिंह यांच्या प्रयत्नातून मंजूरी देण्यात आली आहे. या निधीच्या माध्यमातून शहरातील विविध विकासकामे लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती दि.१५ मार्च रोजी माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी दिली.

मंजूर करण्यात आलेल्या निधीमधून फलटण नगरपरिषद हद्दीतखालील कामे करण्यात येणार आहेत.

१) प्रभाग क्र. ६ शनीनगर येथे पत्रा शेड बांधणे व पेव्हर ब्लॉक बसविणे.
२) प्रभाग क्र. ५ राजू निंबाळकर घर ते शाळा क्र. ६ बंदिस्त गटर व काँक्रीट रस्ता करणे.
३) प्रभाग क्रमांक ११ पद्मावती नगर ते सदाशालीन अपार्टमेंट रस्ता काँक्रिटीकरण करणे
४) प्रभाग क्र.५ येथे जिम्नॅशियम हॉल, एम. पी. थिएटर व स्विमिंग पूल (जलतरण तलाव) बांधणे. 
५) प्रभाग क्र.५ येथील स्वामी समर्थ समर्थ मंदिरा शेजारी १० युनिट शौचालय ओवर हेड टैंक सह बांधणे 
६) प्रभाग क्र.५ येथे महिला व पुरुषांकरिता करिता मुतारी बांधणे
७)  प्रभाग क्र. ४ येथे साई मंदिर शेजारी ओपन स्पेस मध्ये अंगणवाडी बांधणे
८) प्रभाग क्र. ४ येथील दत्त मंदिर येथे सामाजिक सभागृह बांधणे
९) प्रभाग क्र. ३ मधील पाण्याची टाकी, सगुणामाता नगर येथे नाना नानी पार्क बांधणे
१०) नगरपालिका पार्किंग तारांगण अॅक्वेरियम (मत्सालय) बांधणे.
११) फलटण नगरपरिषद करिता अग्निशमक गाडी
१२) शंकर मार्केट येथे सिटी हॉस्पिटल बांधणे
१३) प्रभाग क्र. ३ जिंती नाका येथील गोसावी वस्ती येथे नगर परिषद शाळा बांधणे
१४) अहिंसा मैदान येथे सभागृह बांधणे
१५) रविवार पेठ येथील जुना सरकारी दवाखाना येथे वाचनालय फर्निचर सह बांधणे
१६) प्रभाग क्रमांक १२ गोळीबार मैदान येथे बंदिस्त गटर बांधणे
१७) प्रभाग क्रमांक १२ विद्यानगर येथे बंदिस्त गटार बांधणे
१८) वार्ड क्र. ५ काळूबाई नगर येथे नगरपालिका जागेत ईन लाईन व ऑउट पाईप लाईन सहित पाण्याची टाकी बांधणे
१९) हॉटेल अशोका शेजारी नगरपालिका जागेत महिलांकरीता जिम्नॅशियम हॉल व योग सेंटर बांधणे
२०) हॉटेल अशोका शेजारी नगरपालिका जागेत महिलांकरीत जिम साहित्य देणे.
२१) प्रभाग क्र. ६ शनीनगर येथील बगीचा मध्ये मल्टी पर्पज हॉल बांधणे
२२) मंगळवार पेठ प्रबुध्दविद्या भवन येथे नगरपालिका जागेत बंदिस्त सभागृह बांधणे
२३) प्रभाग क्र. १ कतार गल्ली येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे
२४) प्रभाग क्र. १ गल्ली येथे बंदिस्त गटार करणे
२५) प्रभाग क्र. १० मारवाड पेठ येथे बंदिस्त गटार करणे
२६) प्रभाग क्र. ३ कुरेशीनगर येथे नगरपालिका जागेत संरक्षण भिंत बांधणे
२७) प्रभाग क्र. १० स्वामी समर्थ मंदिर शेजारी समाज मंदिर बांधणे
२८) प्रभाग क्र. १० सवळे घर ते बाणगंगा नदी पर्यंत बंदिस्त गटार करणे
२९) प्रभाग क्र. १२ महाराजा मंगल कार्यालय येथील नाना नानी पार्क मध्ये मल्टी पर्पज हॉल बांधणे.
३०) प्रभाग क्र. १ फिरंगाई मंदिर ते प्रसाद शिंदे घर रस्ता करणे
३१) प्रभाग क्र. १ मंगेश आवळे घरे ते उषा चव्हाण घर रस्ता करणे
३२) प्रभाग क्र. ३ जिंती नाका गोसावी वस्ती येथे नगरपालिका जागेत व्यायाम शाळा बांधणे.
३३) प्रभाग क्र. ५ येथील वारकरी भवन येथे पहिला मजला बांधणे.
३४) प्रभाग क्र. ९ बारामती बँक ते श्री बामणे घरा पर्यंत रस्ता करणे.
३५) प्रभाग क्र. ९ येथील स्वामी समर्थ मठ ते समोरील गल्ली मध्यों काँक्रीटीकरण करणे.
३६) हॉटेल जायका समोरील रस्ता ते शिर्के घरा पर्यंत रस्ता करणे.
३७) प्रभाग क्र. ८ नगरपालिका शाळा क्र. ७ शेजारील नगरपालिका जागेत व्यायाम शाळा बांधणे
३८) प्रभाग क्र. ५ येथे मुस्लिम कब्रस्थान करीता संरक्षण भिंत बांधणे
३९) प्रेमिलाताई चव्हाण हायस्कूल समोरील ग्राउंड मध्ये रात्रीचा मैदानी खेळासाठी लाईटची सोय करणे. (हायमास्ट व एल.ई.डी. बल्ब वगळून)

No comments