Breaking News

मुधोजी महाविद्यालयात सातारा विभागीय शूटिंग हॉलीबॉल स्पर्धा संपन्न

Satara Divisional Shooting Holliball Competition concluded at Mudhoji College

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - मुधोजी महाविद्यालय,फलटण येथे संपन्न झालेल्या सातारा विभागीय शूटिंग हॉलीबॉल पुरुष स्पर्धेमध्ये शहाजीराजे महाविद्यालय खटाव - प्रथम क्रमांक मिळवला, आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा - द्वितीय क्रमांक मिळवला,  मुधोजी महाविद्यालय फलटण - तृतीय क्रमांक मिळवला तर कला व वाणिज्य महाविदयालय नागठाणे-चतुर्थ क्रमांक मिळवला.

    फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम सर तसेच मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एच.कदम सर यांनी सर्व विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन केले.

No comments