३ तासात लोणंद पोलीसंकडून अपहरण झालेल्या मुलाचा शोध
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२७ - निंबोडी तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथील अल्पवयीन मुलाचे अज्ञात इसमाने दिनांक 25 मार्च 2024 रोजी अपहरण केले असता, गुंहा दाखल झाल्यानंतर लोणंद पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत अवघ्या ३ तासांमध्ये अपहरण झालेल्या मुलाचा शोध घेऊन, त्याला सुखरूपपणे पालकांच्या ताब्यात दिले.
लोणंद पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर 134/2024 भा.द.वि..सं. 363 प्रमाणे दिनांक 25/3/2024 रोजी दाखल आहे. सदर गुन्हयातील अपहरीत मुलगा वय 17 वर्षे 8 महीने 23 दिवस रा. निंबोडी ता. खंडाळा जि. सातारा यास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणास्तव पळवुन नेलेबाबत त्याचे नातेवाईकांनी फिर्याद दाखल केली होती. सदर गुन्हयाचा तपास पोउनि श्री शिवाजी काटे यांचेकडे देण्यात आला आहे.
श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री राहुल धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण भाग यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि श्री सुशिल बी. भोसले यांनी पोउनि श्री शिवाजी काटे यांना तपासाच्या सुचना व मार्गदर्शन दिले. त्याप्रमाणे पोउनि श्री शिवाजी काटे यांनी पिडीत अपहरीत मुलगा याची गोपनिय बातमीदार यांचे मदतीने माहीती प्राप्त करुन कोणताही वेळ न घालवता होमगार्ड अमर सुळ यांना सोबत घेऊन, वरीष्ठांचे तोंडी परवानगीने पुणे येथील कात्रज येथुन अपहरीत मुलगा वय 17 वर्षे 8 महीने 23 दिवस रा. निंबोडी ता. खंडाळा जि. सातारा यास ताब्यात घेऊन त्यास पोलीस स्टेशनला आणुन त्याचेकडे तपास करुन सुखरुप नातेवाईकांचे ताब्यात दिला आहे.
सदरची कारवाई ही श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा, राहुल धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण भाग यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री सुशिल भोसले सहा. पोलीस निरीक्षक, पोउनि श्री शिवाजी काटे व होमगार्ड अमर सुळ यांनी कारवाईत सहभाग घेतला आहे.
No comments