Breaking News

फलटण तालुक्याचे 'भाऊ' गेले ; सुभाषराव शिंदे यांचे दुःखद निधन

Subhasrao Shinde passed away

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१३ -  फलटण तालुका दूध संघाचे माजी चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विश्वासू सहकारी व फलटण तालुक्याचे आवडते भाऊ सुभाषराव शिंदे यांचे पुणे येथे उपचार घेत असताना निधन झाले आहे.

    सुभाषराव शिंदे हे ७७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, ६ मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. फेब्रुवारी महिन्यात सुभाषराव शिंदे यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने, फलटण येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती आणखी बिघडू लागल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉस्पिटल मध्ये दाखल आले. आज त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने फलटण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. 

No comments