Breaking News

आमचं ठरलं! माढ्यातुन खा. रणजितसिंहच - आ.बबनदादा, आ.संजयमामा, आ.जयकुमार, आ.शहाजीबापू, आ.राम सातपुते

We decided! Eat from the bull. Ranjit Singh - A. Babandada, A. Sanjaymama, A. Jayakumar, A. Shahajibapu, A. Ram Satpute

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टेंभुर्णी येथे दि.१८ मार्च रोजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह  माढा लोकसभा मतदार संघातील आमदार एकत्र  आले होते.  यामध्ये आ. बबनदादा शिंदे, आ. शहाजीबापू पाटील, आ.संजयमामा शिंदे, आ. जयकुमार गोरे, आ.राम सातपुते यांच्यासह दीपकआबा साळुंखे पाटील, कल्याणराव काळे, चेतनसिंह केदार व इतर मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे अधिकृत उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विजयी करण्याचे व माढा लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा कमळ फुलवण्याचा निर्णय घेण्यात आला.

    यावेळी,  सर्वांनी एक दिलाने काम करून, खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भरघोस मताधिक्यांनी निवडून आणण्याचे, बैठकीत ठरले असल्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सर्व आमदारांच्या वतीने जाहीर केले.

    माढा लोकसभा मतदारसंघात, भाजपाकडून माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, महायुतीतील  सर्व आमदार व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन, महायुतीतील पक्षांच्या पॉलिसीचा विचार करून, निवडणुकीच्या दृष्टीने ध्येयधोरण ठरवण्यासाठी  बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

    या बैठकीत कुणाच्याही विरोधात निगेटिव्ह चर्चा झाली नसून, सर्व लोकप्रतिनिधींची इच्छा आहे की, महायुतीची वज्रमुठ अशीच राहावी, जे कोणी या वज्रमुठीत नाहीत, त्यांना सामील करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न चालू आहेत. त्याचबरोबर आम्ही देखील प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.   माढा लोकसभा मतदारसंघात जास्तीत जास्त लीड खेचण्याच्या दृष्टीने बैठकीत चर्चा झाली असल्याचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

No comments