धैर्यशील मोहिते पाटील यांची ऋषीराज नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी भेट
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२९ - माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी युवा नेते ऋषीराज नाईक निंबाळकर यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.यावेळी जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे सर्वेसर्वा सह्याद्री चिमणराव कदम,राष्ट्रीय काँग्रेसचे फलटण तालुका अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी बेडके,फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चेतन सुभाषराव शिंदे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी युवा नेते ऋषिराज नाईक निंबाळकर व त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका रश्मीताई नाईक निंबाळकर व त्यांचे चिरंजीव शिबिराज नाईक निंबाळकर यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना जाहीर पाठिंबा दिला. यावेळी बोलताना ऋषीराजभैय्या म्हणाले धैर्यशील मोहिते पाटील यांना आपण स्नेह भोजनाचे निमंत्रण दिले होते, त्याचा मान ठेऊन ते प्रचार दौऱ्यातील व्यस्त नियोजनातून वेळ काढून आज घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी ऋषिराज नाईक निंबाळकर यांनी फलटण शहरातून जास्तीचे मताधिक्य देण्याचे आश्वासन धैर्यशील मोहिते पाटील यांना दिले.
No comments