धैर्यशील मोहिते पाटील यांनी घेतली सह्याद्री कदम यांची भेट
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.५ - युवा नेते सह्याद्री चिमणराव कदम यांच्या फलटण येथील निवासस्थानी सोलापूर जिल्ह्याचे युवा नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी भेट दिली. माढा लोकसभा मतदार संघात अद्याप मविअचा उमेदवार ठरला नसल्या मुळे या भेटीस महत्व प्राप्त झाले आहे. दरम्यान योग्य वेळी आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे मत यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.
माढा लोकसभा मतदारसंघांमधून आगामी लोकसभा निवडणूक लढवणार का ? याबाबत युवा नेते धैर्यशील मोहिते पाटील यांना विचारले असता, येत्या काही दिवसात आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे मत यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.
धैर्यशील मोहिते पाटील घरी आल्यानंतर सह्याद्री चिमणराव कदम यांनी त्यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले. याप्रसंगी सौ. चाहत सह्याद्री कदम उपस्थित होत्या.
No comments