मोठ्या शक्ती प्रदर्शनात खा. रणजितसिंह व आ. राम सातपुते यांचा उमेदवारी अर्ज दाखल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.18 - माढा लोकसभा मतदार संघातून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकुर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महायुतीतर्फे भाजपच्या वतीने विद्यमान खासदार रणजितसिंह यांना पुन्हा संधी देण्यात आली. उमेदवारी अर्ज भरताना सोलापूर येथे मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माढ्याचे आमदार बबनराव शिंदे, करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे, सांगोल्याचे आमदार शहाजी बापू माण चे आमदार जयकुमार गोरे उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी मित्र पक्षाचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनीही मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले.राम सातपुते यांच्यासोबत आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार राजन पाटील, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख तसेच भाजपचे युवा नेते विकास वाघमारे या पाच जणांनी निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी ही पूरक म्हणून आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे दाखल केला आहे.
No comments