फलटण मध्ये इंडिया आघाडीची बैठक संपन्न
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.23 - आगामी लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने फलटण मधील इंडिया आघाडीतील घटकपक्षांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत सर्व घटकपक्षांचे तालुका अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व पुढील चार दिवसात सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मते जाणून घेण्यासाठी एक व्यापक बैठक आयोजित करण्यात यावी असे ठरले.
No comments