कावडी शिखर शिंगणापूर कडे मार्गस्थ
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१९ - राज्यातील अनेक भागातून कावडी शिखर शिंगणापूर पूर कडे जात असतात, आज फलटणहुन पुढे मार्गक्रमण करीत शिखर शिंगणापूरकडे कवडी मार्गस्थ झाल्या, यावेळी शंभू महादेवाचे भक्त व आबालवृद्ध कावडींचे दर्शन मोठ्या भक्तिभावाने घेतात.
फलटण कडून शिखर शिंगणापूर कडे जाणाऱ्या शिखर शिंगणापूर येथील प्रसिद्ध मुंगी घाटातून या कावडी शंभू महादेवाचा धावा करीत या कावडी, ढोल ताशांच्या गजरात शंभू महादेवाच्या डोंगरावर अवघड आशा मुंगी घाटातून चढतात वर जाऊन अनेक तीर्थक्षेत्रावरून भरून आणलेल्या मोठ्या घागरीतून खांद्यावर आणलेल्या कावडीतील तीर्थाने शंभू महादेवास हे भक्त लोक मोठ्या भक्ती भावाने स्नान घालून अभिषेक करतात. सासवड जिल्हा पुणे येथील संत तेल्या भुतोजी यांची मानाची कावड असून कावडी यात्रेत प्रथम मान या कावडीस दिला जातो.
No comments