धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवारांच्या ५ जाहीर सभा
5 public meetings of Sharad Pawar to campaign for courageous Mohite Patil
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२० - माढा लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष व महाआघाडीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचार सभांचा कार्यक्रम शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार यांनी जाहीर केला आहे.
दि. २६/०४/२०२४ रोजी दुपारी ११ ते १ वाजेपर्यंत करमाळा, टेम्भुर्णी येथे, दुपारी ३ वाजता सांगोला येथे, सांयकाळी ५.३० वाजता पंढरपूर येथे शरद पवार यांची जाहीर सभा ठेवण्यात आली आहे. दि.२७/४/२०२४ रोजी दहिवडी येथे सकाळी ११ वाजता सभा असून दि. ३०/०४/२०२४ रोजी फलटण येथे सकाळी ११ वाजता शरद पवार यांची जाहीर सभा ठेवण्यात आली आहे.
या प्रचार सभांना माढा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या महाआघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक बंधू- भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे राष्ट्रवादी काँग्रेस कडून करण्यात आले आहे.
No comments