Breaking News

'गंधवार्ता' च्या श्रीमंत रामराजे वाढदिवस विशेषांकाचे श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते प्रकाशन

गंधवार्ता विशेषांकाचे प्रकाशन करताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, शामराव अहिवळे, प्रा. रमेश आढाव,ॲड. रोहित अहिवळे, बापूराव जगताप, जमशेद पठाण, विशाल मोहिते

Publication of Ramaraje Birthday Special Issue of Gandhawarta

  फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ९ एप्रिल - महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते अनंत मंगल कार्यालय, फलटण येथे  'गंधवार्ता' च्या श्रीमंत रामराजे वाढदिवस विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी दैनिक गंधवार्ताचे संस्थापक संपादक शामराव अहिवळे, जेष्ठ पत्रकार रमेश आढाव, गंधवार्ताचे संपादक ॲड. रोहित अहिवळे, रामआदेशचे संपादक बापूराव जगताप, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष जमशेद पठाण, गंधवार्ताचे विशाल मोहिते उपस्थित होते. 

    'गंधवार्ता' च्या वाढदिवस विशेषांकाचे प्रकाशन झाल्यानंतर, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विशेषांकाचे अवलोकन करून गंधवार्ताच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments