रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच विजयी करणार ; ॲड. जिजामाला यांच्या गावभेट दौऱ्यात नागरिकांकडून ग्वाही
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.५ - माढा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ त्यांच्या सुविद्य पत्नी व माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांचा फलटण तालुक्यात गावभेट दौरा सुरू आहे. या गावभेट दौऱ्या प्रसंगी महिला, दिव्यांग बांधव यांनी जिजामाला यांची भेट घेऊन, आम्ही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच विजयी करणार असल्याचे सांगितले. तर मलवडी ता. फलटण येथे गावभेटी प्रसंगी मलवडी येथील महिलेने पारंपारिक ओवी गाऊन जिजामाला यांचे स्वागत केले व रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनाच आम्ही विजयी करणार असल्याचे सांगितले.
ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी वडजल, काशीदवाडी, ढवळेवाडी, नांदल, घाडगेमळा, सुरवडी, मुळीकवाडी, सासवड, हिंगणगाव, कापशी, टाकूबाईचीवाडी, मिरगाव, मलवडी, वडगाव, वाघोशी, कोऱ्हाळे, बिबी, घाडगेवाडी, आळजापूर, आदर्की बुद्रुक, आदर्की खुर्द, सालपे, शेरेचीवाडी या गावांच्या गावभेटी घेतल्या असून ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले व भाजपाचा उमेदवारच आम्ही निवडून देणार असल्याचे मतदारांनी सांगितले.
No comments