महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची बिनविरोध निवड
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह सरचिटणीस डॉ.चंद्रजीत जाधव, खजिनदार ॲड. गोविंद शर्मा |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.७ - महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची विशेष वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दिनांक ७ एप्रिल २०२४ रोजी दुपारी १२ वाजता शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे संपन्न झाली. यामध्ये महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची चौवार्षिक निवडणूक कार्यक्रम २०२४-२०२८ यासाठी बालेवाडी, पुणे येथे विशेष सभा घेण्यात आली, यामध्ये महाराष्ट्र खो-खो असोसिएशन च्या अध्यक्षपदी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्षपदी आ. जितेंद्र आव्हाड, अनिकेत तटकरे, महेश गादेकर,अशोक पितळे, तर कार्याध्यक्षपदी सचिन गोडबोले, सरचिटणीस पदी डॉ.चंद्रजीत जाधव, खजिनदारपदी ॲड.गोविंद शर्मा, सहसचिव पदी डॉ.राजेश सोनवणे, डॉ.पवन पाटील, जयंशु पोळ, बाळासाहेब तोरसकर, सौ. वर्षा कच्छवा यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
No comments