शरद पवारांनी घेतली ५७ वर्षानंतर काकडे कुटुंबाची भेट
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१२ - ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राजकीय प्रतिस्पर्धी असणारे संभाजीराव काकडे, बाबालाल काकडे यांच्या कुटुंबातील सदस्यांची शुक्रवारी भेट घेतली.
माजी खासदार संभाजी काकडे यांच्या पत्नी श्रीमती कंठावती काकडे यांचं नुकतंच निधन झाले त्यामुळे शरद पवार साहेब यांनी काकडे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी सौ. आशालता काकडे, श्री. शामराव काकडे, श्री. राहुल काकडे, श्री. पृथ्वीराज काकडे, श्री. सतीश काकडे, श्री. शामकाका काकडे, श्री. सह्याद्री चिमणराव कदम (भैय्यासाहेब) उपस्थित होते.
राज्याच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या काकडे कुटुंबाच्या घरी खासदार शरद पवार यांनी भेट दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा झाली. १९६७ पासून राज्याच्या विविध निवडणुकीत पवार -काकडे संघर्ष टोकाला गेलेला सर्वांनी पाहिले आहे, आज शरद पवारांनी ५७ वर्षानंतर काकडे कुटुंबाची भेट घेतली आहे.
No comments