खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना प्रचंड मतांनी विजयी करा - आ. जयकुमार गोरे
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २९ - माढा लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी मतदारसंघाची बाजू लोकसभेत कायम प्रभावीपणे मांडली आहे. शासन दरबारी पाठपुरावा करून जिहे-कठापूर सारख्या अनेक सिंचन योजना व विकासकामे माण- खटाव मतदारसंघात व वडूज शहरात घडवून आणली आहेत. त्यामुळेच माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत खासदार रणजीचे नाईक निंबाळकर यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन आमदार जयकुमार गोरे यांनी केले.
आमदार जयकुमार गोरे वडूज तालुका खटाव येथील कोपरा सभेत बोलत होते यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर, मेघाताई पुकळे, जीवनशेठ पुकळे, प्रा.बंडा गोडसे सर ,नंदकुमार गोडसे भैय्या ,प्रदिप शेटे,भरत आप्पा घनवट, आप्पासाहेब गोडसे,अनिल अण्णा गोडसे, संदिप गोडसे,निलेश काका गोडसे,शशीभाऊ पाटोळे,संजय काळे, शशीभाऊ काळे ,विनायक खाडे, संभाजी गोडसे, सचिनशेठ माळी, जयवंत पाटील, अनिल माळी,सोमनाथशेठ जाधव, प्रदिप खुडे,गणेशशेठ गोडसे, श्रीकांत काळे, बनाजी पाटोळे ,अमोलशेठ गोडसे, बापु ननावरे,जयवंत गोडसे, रणजीत गोडसे भैया ,अमोल वाघमारे,राजूकाका चव्हाण, श्रीकांत काका बनसोडे, विक्रमशेठ रोमन , डॉ.रोहन गोडसे,निलेश कर्पे, वचनशेठ शहा, अक्षय थोरवे , कुणाल गडांकुश ,सुधीर गोडसे ,ऋषी पडळकर ,राहुल लोहार ,आकाश जाधव,विशाल महामुनी,सागर पाटोळे, व वडूज च्या नगरसेवीका रेश्मा बनसोडे ,रेखा माळी, किशोरीताई पाटील, महिला मोर्चा अध्यक्षा शितल गोडसे व वडूज चे सर्व आजी-माजी नगरसेवक ,पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.
No comments