मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत - -कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक
सातारा, (जि.मा.का.) :- सातारा लोकसभा मतदानापूर्वीचे 72 तासात सर्व बँकांनी रुपये 10 लाखाचे वरील व्यवहार रोखीने करू नयेत, वैद्यकीय कारणास्तव व आवश्यकता असल्यास पुराव्याची खातरजमा करावी, अशा सूचना कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक, 45-सातारा लोकसभा मतदासंघ यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक खर्च निरीक्षक, सातारा लोकसभा मतदार संघ कुमार उदयन यांचे अध्यक्षतेखाली जिल्हयातील सर्व राष्ट्रीयकृत बँक व सहकारी बँक यांचे प्रतिनिधी समवेत बैठक आयोजित करणेत आली होती. सभेस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम आदी उपस्थित होते.
सर्व बँकांनी मतदानापुर्वीच्या 72 तासात सर्व रोखीचे व्यवहाराची KYC पाहूनच पूर्तता करावी, व्यवहार करताना योग्य कारणाची खातरजमा करावी आदींबाबत सूचना करण्यात आल्या.
No comments