स्व.चिमणराव कदम यांचा गट आजही सक्षमपणे कार्यरत ; भूलथापांना तालुक्यातील जनता बळी पडणार नाही
Chimanrao Kadam's group is still functioning efficiently today
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.६ - माजी आमदार स्व. चिमणराव कदम यांच्या नंतर युवक नेते सह्याद्री चिमणराव कदम यांच्या नेतृत्वात फलटण तालुक्यातील स्व. चिमणराव कदम यांचा गट आजही सक्षमपणे कार्यरत आहे. निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये मुद्दामहून कोणीतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अश्या भूलथापांना फलटण तालुक्यातील जनता बळी पडणार नाही असे रविवार पेठ तालीम मंडळाचे अध्यक्ष तथा सह्याद्रीभैय्या चिमणराव कदम युवा मंचचे अध्यक्ष सुरज कदम व गिरवीच्या सरपंच सौ. वैशाली राजेंद्र कदम यांनी सांगितले.
ज्येष्ठ नेते शरद पवार हे ५५ वर्षाचा संघर्ष संपवून काही दिवसांच्या पूर्वी फलटण येथे सह्याद्री कदम यांच्या निवासस्थानी आले होते. त्यामुळे फलटण तालुक्यातील लोकसभेची गणिते नक्कीच बदलणार आहे. ह्या लोकसभेला महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते – पाटील यांना विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी आमचे नेते सह्याद्री कदम हे काम करीत आहेत व त्याचा परिणाम येत्या ४ जुन रोजी दिसणार असल्याचे सूरज कदम यांनी सांगितले.
लोकसभेला आमचे नेते सह्याद्री कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते विरोधकांना पाठिंबा दिल्यामुळे पोटशूळ उठला आहे. त्यामुळेच विरोधक अपप्रचार करत असल्याचे सौ. वैशाली कदम यांनी यावेळी स्पष्ट केले.
फलटण तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी माजी आमदार स्व. चिमणराव कदम यांनी कायमच कामकाज केले होते. त्यांच्यानंतर आमचे नेते सह्याद्री कदम हे आज सुद्धा मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून फलटण तालुक्याचा विकास करण्यासाठी आम्ही स्व. चिमणराव कदम यांचा गट कायम कटिबद्ध आहे सध्या राजकारणामध्ये भूमिका दुसरी घेतल्याने विरोधी गट मुद्दामून अफवा पसरवत आहे; असेही सुरज कदम यांनी यावेळी स्पष्ट केले.
No comments