ॲड. रोहित अहिवळे व यशवंत खलाटे यांना दर्पण पुरस्कार जाहीर
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१७ - महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी तर्फे देण्यात येणारे राज्यस्तरीय विशेष दर्पण पुरस्कार दैनिक गंधवार्ताचे संपादक ॲड. रोहित शामराव अहिवळे व दैनिक पुण्यनगरी सातारा आवृत्तीचे फलटण तालुका प्रतिनिधी यशवंत खलाटे यांना जाहीर करण्यात आला. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी, पोंभुर्ले ग्रामपंचायत, जांभे - देऊळवाडी ग्रामस्थ, जांभेकर कुटूंबिय यांच्या संयुक्त सहकार्याने ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या १७८ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्याचा विशेष कार्यक्रम पोंभुर्ले, ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग येथील दर्पण सभागृहात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या संस्थेतर्फे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणार्या ३२ व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा संस्थेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी केली.
No comments