Breaking News

धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ बिरदेवनगर, जाधववाडी येथे प्रचाराचा शुभारंभ

Dhairyasheel Mohite Patil started his campaign in Birdevnagar, Jadhavwadi

फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२ -रा ष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी व मित्रपक्ष आघाडीचे ४३ माढा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार मा.श्री.धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ जाधववाडी ता.फलटण येथे भव्य पदयात्रा (घरभेटी) शुभारंभ शुक्रवार, दिनांक ०३ मे २०२४ रोजी सकाळी ८.३० वाजता बिरदेवनगर मंदिर येथे श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर, विश्वतेजसिंह रणजीतसिंह मोहिते पाटील, सचिन सुभाषराव सुर्यवंशी बेडके, महेंद्र सुभाषराव सुर्यवंशी बेडके, चेतन सुभाषराव शिंदे, श्रीमंत सत्यजीतराजे संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजीतराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर, अच्युतराव पांडुरंग खलाटे, जयकुमार इंगळे, प्रमोद निंबाळकर (आण्णा), शंभूराज खलाटे, अमिरभाई शेख, पंकज पवार, शिवसेनेचे प्रदीप झणझणे, विकास नाळे, विकास राऊत, संतोष सोळस्कर, अनिकेत नाळे, विरसेन सोनवणे, हरीश काकडे (आप्पा), विकी काकडे, आम आदमी पार्टीचे धैर्यशील लोखंडे, विरसेन सोनावणे, डॉ.महेशकुमार, खरात, रोहित अहिवळे, तसेच फलटण नगर परिषदेचे नगरसेवक, नगरसेविका इत्यादी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

तरी या पदयात्रेस (घरभेटी) सर्व बंधू भगिनी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आलेले आहे.

No comments