Breaking News

धैर्यशील मोहिते पाटील यांना प्रचंड मताधिक्यानी विजयी करणार ; भाऊंचा घोडा तालुक्यात पुन्हा एकदा नाचवणार - चेतन सुभाष शिंदे

Dhairyasheel Mohite Patil will win with a huge margin - Chetan Subhash Shinde

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२ - माढा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना प्रचंड मताधिक्य देऊन विजयी करणार असून, भविष्यात भाऊंचा घोडा फलटण तालुक्यात पुन्हा एकदा नवीन जोमाने नाचवणार असल्याचे फलटण बाजार समितीचे संचालक चेतन सुभाष शिंदे यांनी स्पष्ट केले.

    माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकी संदर्भात फलटण विधानसभा कार्यक्षेत्रातील कै.सुभाषराव शिंदे यांना मानणाऱ्या व विचारांच्या कार्यकर्त्यांची बैठक माजी उपसभापती व फलटण मार्केट कमिटीचे विद्यमान संचालक चेतन शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली फलटण येथील "जिद्द" या निवास्थानी बुधवार दि.१ मे रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत चेतन शिंदे बोलत होते. याप्रसंगी सौ. प्रतिभा चेतन शिंदे यांच्यासह फलटण तालुक्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते. 

    यावेळी बोलताना सौ. प्रतिभा शिंदे म्हणाल्या की, कै. सुभाष भाऊ यांच्या विचारांच्या कार्यकर्त्यांची बैठक आपण घेतली, या बैठकीस  खूप चांगला प्रतिसाद मिळाला असून, माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचार जोमाने सुरू करणार असून, त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचं या बैठकीत ठरवण्यात आले आहे. यापुढेही आदरणीय शरद पवार व कै. सुभाष शिंदे यांच्या विचारानेच राजकारणात व समाजकारणात आपण कार्य करणार असल्याचे प्रतिभा शिंदे यांनी सांगितले.

No comments