पालखी महामार्गाच्या कामात अडथळे निर्माण करणारी बांधकामे सक्तीने काढण्यास सुरुवात - प्रांताधिकारी सचिन ढोले
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.३१ - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा येण्यापूर्वी पालखी महामार्गाचे जास्तीत जास्त काम पूर्ण करण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे त्या अनुषंगाने तरडगाव, विडणी, पिंपरद, बरड या भागात मोबदला घेऊनही किंवा वैयक्तिक वादाने मोबदला न उचललेले खातेदार बांधकाम पाडू देत नव्हते, त्यामुळे पालखी महामार्ग पूर्ण करण्यासाठी अडचणी येत होत्या, या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाच्या मदतीने अशी बांधकामे पाडण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असून, लवकरच फलटण बारामती मार्गावर जे अडथळे आहेत, त्या बाबतीतही ही कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाचे काम सुरू होताना, रस्त्याच्या कडेला असणाऱ्या जमिनी संपादित करण्यात आल्या, त्यांना शासनाकडून मोबदला दिला गेला, परंतु काही खातेदार मोबदला घेऊनही बांधकाम काढत नव्हते, तर काहीजण वैयक्तिक वादामुळे बांधकाम काढून घेत नव्हते, या बांधकामामुळे पालखी महामार्ग पूर्ण करण्यास अडथळा येत होता, ती बांधकामे पोलीस बंदोबस्तात पाडण्यात पाडण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
No comments