फलटण शहरातील होर्डिंग काढण्यास सुरवात
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२९ - फलटण शहरातील खाजगी इमारतीवर तसेच सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले बॅनर, होर्डिंग काढण्याची मोहीम फलटण नगर परिषदेच्या वतीने सुरू करण्यात आले असून, बोर्डिंग धारकांना होर्डिंग काढण्याबाबत सूचित करण्यात आले असल्याची माहिती निखिल मोरे यांना प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिद्धी पत्रकात असे म्हटले आहे की, फलटण शहरातील नागरिकांना कळविण्यात येते की, खाजगी इमारतीवरील व सार्वजनिक ठिकाणी उभारलेल्या होर्डिंग धारकांना दि.१७/५/२०२४ चे पत्राने अनधिकृत होर्डिंग काढणे बाबत सुचित केले होते. सद्यस्थितीत वादळी वाऱ्यामुळे मोठ्या आकाराचे होडींग बोर्ड तुटून, रस्त्यावरील नागरीकांच्या अंगावर पडून जीवितहानी होण्याच्या घटना घडत आल्यामुळे आज दिनांक २९/५/२०२४ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील एक, सावता माळी मंदिर येथील तीन, व बारामती पुलाजवळील दोन असे एकूण सहा होर्डिंग आज काढून घेणेची कार्यवाही करण्यात आली.
No comments