खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ दहिवडीत नितीन गडकरी यांची सभा
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२ - देशाचे कणखर, लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यासोबत विकसित भारताचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी अहोरात्र झटणारे विकासपुरुष, देशातले सर्वात कार्यक्षम केंद्रीय रस्ते, वाहतूक, परिवहन विकास मंत्री नितिन गडकरी साहेब यांची माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन 3 मे 2024 रोजी दुपारी ठीक 2 वाजता बाजारतळ पटांगण, दहिवडी तालुका माण येथे आयोजित करण्यात आली आहे.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे सख्य संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेला माहित आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या कार्यकाळात मतदारसंघातील रस्त्यांसाठी हजारो कोटी रुपये मंजूर करून मतदार संघात मोठा विकास केला आहे यासाठी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे हे संपूर्ण मतदारसंघातील जनतेने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे. त्यामुळे स्वतः गडकरी साहेब खासदार निंबाळकर यांना आशीर्वाद देण्यासाठी मतदार संघात माण तालुक्यातील दहिवडी येथे येत आहेत.
तरी भारतीय जनता पार्टी माण तालुका यांच्या वतीने माढा लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
No comments