मराठा,धनगर आरक्षण प्रश्न , शेतकऱ्यांना वीज, परदेशी शिक्षण योजनेत विद्यार्थी संख्या वाढवण्यासह संजय अहिवळे यांच्या इतर मागण्या
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.३० - मागासवर्गीय लोकांचा निधी वाढवावा, बार्टीच्या परदेशी शिक्षण योजनेत विद्यार्थी संख्येमध्ये वाढ करावी, मराठा व धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न ताबडतोब निकाली काढा,तसेच ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण द्या,शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज द्या,व त्यांच्या शेती पंपाचे व घरगुती वीज बिल माफ करा,व शहरातून जाणाऱ्या कालव्याचे अस्तरीकरण करा,बारामती तालुक्या प्रमाणे ऊसाला भाव देऊन,मागील फरकाची देणी चुकती करावीत अशी मागणी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय अहिवळे यांनी केली आहे. दरम्यान या मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
विविध मागण्या तसेच राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून फलटण शहर व तालुक्यातील विविध विषय व मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संजय अहिवळे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती, यावेळी ते बोलत होते,यावेळी बोलताना संजय अहिवळे यांनी सांगितले की मी काही दिवसांपूर्वी विविध मागण्यांसाठी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते त्यावेळी राज्य सरकार व स्थानिक प्रशासन यांच्याकडे अनेक मागण्या केल्या होत्या मात्र त्यापैकी एक मागणी पूर्ण केली व इतर मागण्यांकडे दुर्लक्ष केले असा स्थानिक प्रशासनावर त्यांनी केला,यामध्ये शेतकऱ्यांना वीज मोफत द्यावी,व जुनी थकबाकी माफ करावी,शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज उपलब्ध द्या,ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण द्यावे,सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन द्यावी,समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी शिबिरे आयोजित करून मिळणाऱ्या सवलतींचा अधिकचा फायदा द्यावा,फलटण नगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाच तारखेपूर्वी पगार मिळावा,व निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन 30 तारखे पूर्वी मिळावी,पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना पगारवाढ होण्यासाठी गृह खात्याने एक समिती नेमून पगारवाढ करावी व त्यांना पक्की घरे बांधून द्यावीत अशी मागणी केली आहे.
No comments