फलटण तालुका पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती २ जून रोजी संपन्न होणार
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.17 - प्रतीवर्षाप्रमाणे याही वर्षी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती महोत्सव सोहळा दि. २ जून रोजी मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या "लक्ष्मी- विलास" या निवासस्थानी फलटण तालुक्यातील धनगर समाजाच्या नेते मंडळींची व समाज बांधवांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समन्वय समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
या बैठकीला सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, फलटण तालुका दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष प्राध्यापक भिमदेव बुरुंगले, फलटण तालुका पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर, श्रीराम खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दादासाहेब चोरमले, सातारा जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वासदादा गावडे, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती रामभाऊ ढेकळे, खटके वस्तीचे लोकनियुक्त सरपंच बापुराव गावडे, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष खटके, मालोजीराजे सहकारी बँकेचे संचालक भानुदास सरक, महादेवराव सोनवलकर, पोलीस पाटील हनुमंतराव सोनवलकर, ॲड. ऋषिकेश काशीद, फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन लोखंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रवीण खताळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चांगदेव खरात, फलटण तालुका मार्केट कमिटीचे संचालक दिपक गौंड, ज्ञानदेव गावडे, फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंभूराज पाटील, पै. अभिजीत जानकर, पै.भास्कर ढेकळे, नानासाहेब भिसे, प्रदीप लंबाते, रणजित सोनवलकर इ. मान्यंवर याप्रसंगी उपस्थित होते.
No comments