Breaking News

प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या इयत्ता १० वीचा १००% निकालाची परंपरा कायम

Progressive Convent School & Junior College continues its tradition of 100% results for class 10

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.31 - कोळकी: सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कोळकी फलटण येथील इयत्ता १० वीच्या निकालाची १००% निकालाची परंपरा कायम राखली आहे. 

    कु.राज जयवंत कर्वे ९५.८०% गुण, कु.चैतन्य जगदिश यादव ९३.८०%,कु.आर्यन सचिन वांभुरे ९३.६०%, कु. शिवराज संदिप मुळीक ९३.००%, कु. रितु गणेश तुपे ९३.००%, कु.श्रेया आप्पा सोनवलकर ९३.००%, गुण  प्रथम पाच मध्ये व कु.समिक्षा गणेश माने ९२.६०%, कु.मृण्मयी सुभाष जाधव ९१.८०%, कु.निशांत सचिन  रणवरे ९१.६०%,कु.अंतरा शशिकांत ढालपे ९१.४०% कु.यशराज सतिश जमदाडे ९०.४०% कु.साईश सतिश फरांदे ९०.२०% या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण  मिळवले आहेत. तसेच या परिक्षेसाठी ३५ विद्यार्थांनी उत्कृष्ट गुण मिळवून १००% निकालाची परंपरा सलग पाचव्या वर्षी कायम राखली आहे. यासाठी मार्गदर्शक शिक्षक श्री.अमित सस्ते,श्री.महेंद्र कातुरे,श्री. ज्ञानेश्वर जाधव, श्री विजय मदने , श्री.इरफान शेख, श्रीमती आशादेवी भराडे, सौ.सुजाता गायकवाड,  सौ.प्राजक्ता हावळ यांचे मार्गदर्शक लाभले.

    याबद्दल सरस्वती शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.प्रदीप माने , सरस्वती शिक्षण संस्थेच्या कोषाध्यक्षा सौ.सविता माने ,सरस्वती शिक्षण संस्थेचे सचिव श्री.विशाल पवार,सरस्वती शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ.संध्या गायकवाड, प्राचार्य श्री.अमित सस्ते, पर्यवेक्षिका सौ. माधुरी माने समन्वयिका सौ.सुवर्णा निकम व योगिता सस्ते तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक व अभिनंदन केले.

No comments