Breaking News

खा. रणजितसिंह यांच्या पाठीशी आपली संपूर्ण ताकद उभी करा - ना. रामदास आठवले

Raise your full strength behind Ranjit Singh - Ramdas Athavale
  फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. २ :  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांची माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ श्रीपुर ता. माळशिरस येथे जाहीर सभा संपन्न झाली.

        यावेळी बोलताना आठवले साहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या आपल्या पक्षाच्या माढा लोकसभेतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी आपली संपूर्ण ताकद उभी करून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचे आहे अशा सूचना केल्या.

    यावेळी आमदार बबनदादा शिंदे, आमदार प्रसादजी लाड, राजकुमारनाना पाटील, सोमनाथजी भोसले जिल्हाध्यक्ष, सुजित थिटे, मिलिंद सरतापे तालुका अध्यक्ष, राहुल रेडे, शिवशरणजी, सुनील सरवगोड, अशोक दादा चव्हाण, श्यामराव भोसले री.पा. इ., भीमराव भुसणर हटकर समाज अध्यक्ष, विक्रम लाटे नगरसेवक इतर महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने उपस्थित होता...

No comments