विकास कामे अडवणारांना मतदानातून जनता जागा दाखवील - खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.८ - भाजपा महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी निंभोरे येथे मतदान केल्यानंतर फलटण शहरासह माढा लोकसभा मतदारसंघात विविध मतदान केंद्रांना भेट देऊन मतदानाची माहिती घेतली.
माढा लोकसभा मतदारसंघाच्या विकासाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. या निवडणुकीत मागील मताधिक्याचा उच्चांक मोडीत काढत सर्वाधिक मताधिक्य मिळवणार असा विश्वास खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व्यक्त करून, माढा लोकसभा मतदार संघात ज्या लोकांनी विकास कामे अडवली, त्यांना मतदानातून जनता त्यांची जागा दाखवील. विशेष करून पाणी, रेल्वे ही विकास कामे जाणीवपूर्वक ज्या लोकांनी अडवली त्या लोकांना जनता आज मताच्या माध्यमातून गाडल्याशिवाय राहणार नसल्याचे सांगितले.
No comments