मुधोजी महाविद्यालयाच्या विज्ञान शाखा निकालाची यशोगाथा कायम
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकताच बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर केलेला असून फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी महाविद्यालय (कनिष्ठ विभाग) विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या उज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे.
मुधोजी महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल 99.36% लागला आहे. या परिक्षेसाठी एकूण 157 विद्यार्थी प्रविष्ठ झालेले होते त्यापैकी 156 विद्यार्थी उत्तिर्ण झाले आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. पंढरीनाथ कदम , वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ. संजय दिक्षित, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य श्री. संजय वेदपाठक, सर्व प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापकांचे अभिनंदन केले.
No comments