सगुणामाता नगर, मलठण येथे घरातून लॅपटॉप व रोख रकमेची चोरी
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२७ - सगुणामाता नगर, मलठण, फलटण येथे बंद घरात प्रवेश करून, घरातील लॅपटॉप व रोख रक्कम १० हजार रुपये असा एकूण ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे.याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. २२ मे रोजी सकाळी १० ते २६ मे रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या दरम्यान, प्रमोद लालासो मदने यांच्या सगुनामातानगर, मलठण येथील राहत्या घरात, अज्ञात चोरट्याने प्रवेश करून, घरातील २५ हजार रुपये किमतीचा डेल कंपनीचा लॅपटॉप व १० हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली आल्याची फिर्याद प्रमोद लालासो मदने यांनी दिली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.
No comments