धैर्यशील मोहिते पाटील यांच्या याचा प्रचारार्थ तडवळे, नंदवळ, सोळशी, रनदुल्लाबाद परिसरात गावभेट
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२ - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी व मित्रपक्ष आघाडीचे ४३ माढा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ तडवळे, नंदवळ, सोळशी, रनदुल्लाबाद परिसरात गावभेट दौरा संपन्न झाला. या दौऱ्यात उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील, सह्याद्रीभैय्या चिमणराव कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता अनपट, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र बेडके व इतर उपस्थित होते.
तडवळे, नंदवळ, सोळशी, रनदुल्लाबाद व पंचक्रोशीतील गावांना यावेळी भेट दिल्या, काही गावांमध्ये पदयात्राही काढण्यात आली. यावेळी झालेल्या बैठकांमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांना प्रचंड मताधिक्य देऊन विजय करण्याचे आवाहन करण्यात आले.
No comments