विद्यार्थ्यांना ३ दिवसात २ हजार दाखले जारी ; पुढेही विद्यार्थ्यांना लागणारे दाखले प्राधान्याने देणार - प्रांताधिकारी सचिन ढोले
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१० - इयत्ता दहावी, बारावीचे निकाल लागले, विद्यार्थ्यांची प्रवेश घेण्यासाठी धावपळ सूर झाली आहे, प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, रहिवासी दाखला, ईडब्ल्यूएस दाखला,अल्पभूधारक शेतकरी, कुणबी दाखले यांची गरज लागते, या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन ढोले यांनी प्रवेशासाठी लागणाऱ्या दाखल्यांचे महत्त्व लक्षात घेऊन, दाखले काढण्याच्या कामाला प्राधान्य देत अवघ्या तीन दिवसात जवळपास २००० दाखले निर्गमित केले. यापुढेही विद्यार्थ्यांना हवे असणारे दाखले हे प्राधान्याने दिले जातील असे सचिन ढोले यांनी स्पष्ट केले.
दहावी व बारावीच्या निकालानंतर प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना लागणारे २ हजार विविध दाखले निर्गमित केले असून यामध्ये उत्पन्न, एनसीएल दाखला जातीचा दाखला रहिवासी दाखला, ईडब्ल्यूएस दाखला,अल्पभूधारक शेतकरी, कुणबी दाखले यांचा समावेश आहे. सध्या ६ जून पर्यंतचे बहुतांशी दाखले निर्गमित करण्यात आले असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
No comments