Breaking News

श्रीदत्त इंडियाचे संचालक जितेंद्र धारू यांच्या वाढदिवसानिमित्त ३०० जणांनी केले रक्तदान

300 people donated blood on the birthday of Shridatta India director Jitendra Dharu

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.21  – साखर उद्योगातील अग्रगण्य कंपनी श्रीदत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या उद्योगसमूहाचे संचालक जितेंद्र धारू यांच्या ४६ व्या वाढदिवसानिमित्त बुधवार दिनांक १९ रोजी साखरवाडी येथे श्रीदत्त इंडियाच्या कारखाना कार्यस्थळावर कंपनीच्या श्री गणेशोत्सव मंडळ व फलटण तालुका साखर कामगार युनियन यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये ३०० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला.

    दिनांक १९ रोजी सकाळी ९ वाजता कंपनीचे प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी टेक्निकल हेड आमोद पाल,चीफ इंजिनिअर अजित कदम,डेप्युटी जनरल मॅनेजर के आर सतिशचंद्र, कंपनीचे केन मॅनेजर सदानंद पाटील,को जन मॅनेजर दीपक मोरे,कंपनीचे एच आर विराज जोशी, ऋतुराज पाटील,सुरक्षा अधिकारी गणेश मोटे,डेप्युटी चीफ इंजिनिअर नितीन रणवरे, किशोर फडतरे,सुरक्षा अधिकारी अजय कदम,उत्पादन अधिकारी डिस्टलरी अधिकारी प्रमोद नेवसे, फलटण तालुका साखर कामगार युनियनचे उपाध्यक्ष बाळासाहेब भोसले, सेक्रेटरी राजेंद्र भोसले,सुहास गायकवाड, पोपट भोसले, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र भोसले, संजय जाधव,पै संतोष भोसले, महेश पवार, श्री गणेशोत्सव मंडळ (श्रीदत्त इंडिया)अध्यक्ष गोरख भोसले, केन यार्ड सुपरवायझर एस के भोसले, कार्यवाहक मनोज भोसले,विजय माडकर,दिलीप भोसले, अरुण इंगळे, दत्तात्रय जाधव,जनार्धन जगताप, बाळासाहेब भोसले कंपनीचे सर्व कामगार,अधिकारी वर्ग व कंत्राटदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबिरात उस्फुर्त सहभाग घेतला.

No comments