शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी होताना योग्य दिशेने, योग्य गतीने गेलात तर जग मुठीत घेऊ शकाल - सहाय्यक विक्रीकर आयुक्त ऋषीकेश अहिवळे
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. 23 - इयत्ता १० वी, १२ वी हे माध्यमिक शिक्षणातील महत्त्वाचे टप्पे यशस्वीरित्या पार करुन, महाविद्यालयीन जीवनातील विस्तृत प्रवाहात, नवीन जगात तुम्ही प्रवेश करीत आहात, या नवीन विश्वात अनेक मार्ग, दिशा आहेत. योग्य दिशेने, योग्य गतीने गेला तर नक्कीच तुम्ही जग मुठीत घेऊ शकाल असे विचार सहाय्यक विक्रीकर आयुक्त ऋषीकेश अहिवळे यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सहाय्यक विक्रीकर आयुक्त ऋषीकेश अहिवळे |
लुंबीनी बहुद्देशीय संस्था, फलटणच्यावतीने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन येथे इयत्ता १० वी, १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी नालंदा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्काराने इयत्ता १० वी, १२ वी मध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या ३/३ विद्यार्थ्यांना सहाय्यक विक्रीकर आयुक्त ऋषीकेश अहिवळे व अन्य मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले, सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, वह्या, पेन देऊन गौरविण्यात आले.
सहाय्यक विक्रीकर आयुक्त ऋषीकेश अहिवळे म्हणाले, शिक्षणाचे नवविश्व खूप उर्जा, उत्साहाने भारावलेले असल्याने भरकटण्याचा धोकाही तेवढाच आहे, शिक्षणाच्या नवीन प्रवाहात सहभागी होताना गांभीर्याने, सातत्याने अभ्यास केला तर तुम्ही यशाच्या शिखरावर नक्की असणार आहात.
मित्रांनो महाविद्यालयीन जीवन अवघे ५/६ वर्षाचे असते. हे जीवन तुम्ही जसे जगाल तसे तुमचे आयुष्य असेल. ह्या काळात देहभान विसरुन अभ्यास केला तर तुम्ही आपल्या क्षेत्रातील मोक्याच्या जागेवर असणार आहे, आणि ५/६ वर्षे अभ्यास न करता फक्त मजा केली तर आयुष्यभर जीवन कष्टमय असेल कोणत्या मार्गाने जायचे तुम्हीच ठरवा.
पर्यावरण विषयी जागृती करण्यासाठी उपस्थित मान्यवर व मार्गदर्शकांचा हार, गुच्छ, फुले न देता विविध वृक्ष रोप देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी जे. एस. काकडे, विकास काकडे, दत्ता अहिवळे, सुधीर अहिवळे, प्रा. रमेश आढाव, सुनंदा किशोर काकडे, प्रसाद मधुकर काकडे, अनिकेत दिपक काकडे, विशाल जगताप, प्रियदर्शनी सावंत, सचिन मोरे, जितेंद्र खरात, प्रा. डॉ. प्रभाकर पवार, सचिन अहिवळे आणि इयत्ता १० वी, इयत्ता १२ वी मधील गुणवंत विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सौ. वैशाली कांबळे यांनी सूत्र संचालन केले.
लुंबिनी बहुद्देशीय संस्थेचे पदाधिकारी व सभासदांनी कार्यक्रमाचे आयोजन उत्तम केले होते.
No comments