चौकात वाढदिवस साजरा कारणाऱ्यांच्यावर गुन्हा दाखल
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२४ - रात्री चौकात वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाईला लगाम लावत, फलटण शहर पोलिसांनी असे रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्यांच्या वर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. फलटण शहरात पिरॅमिड चौक येथे रात्री ११ वाजता वाढदिवस साजरा करणाऱ्या ६ युवकांवर शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २२ जून २०२४ रोजी रात्री ११.०० वाजता पिरॅमिड चौक, फलटण येथे सुभान आझम जिरायत (वय २२ वर्षे, राहणार तेली गल्ली, फलटण) याचा वाढदिवस असल्याने, सुभान जिरायत व इतर ५ मुले शांतताभंग करताना आढळल्याने या सर्वांवर महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
यामध्ये सुभान जिरायत, यश शहाजी चव्हाण (वय २२ वर्ष, रा. बिरदेव नगर, फलटण), ऋषिकेश दीपक थोरात (वय २३ वर्ष, पवार गल्ली, फलटण), उमेर तन्वीर शेख (वय २२ वर्ष, रा. कसबा पेठ, फलटण), ओम तुषार पवार (वय २२ वर्ष, रा. पवार गल्ली, फलटण) व हर्षवर्धन विश्वकर्मा निकम (वय २२ वर्षे, रा. बुधवार पेठ, फलटण) यांचा समावेश आहे.
सादर कारवाई फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक आर. एस. फाळके यांनी केली आहे.
No comments