चार वर्ष फरार असणारा गुन्हेगाराला फलटण ग्रामीण पोलिसांकडून अटक
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१४ - फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात सन २०२० मध्ये भादवी कलम ३२६, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता, या गुन्ह्यामध्ये बारामती तालुक्यातील अक्षय उर्फ आकाश उर्फ भोऱ्या बापूराव जाधव राहणार मळद हा गेले चार वर्षापासून फरारी होता. सदरचा आरोपी हा बारामती शहर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर ७ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्याच्यावर झोपडपट्टी दादा कायद्यान्वये सुद्धा कारवाई झालेली आहे.
सदर आरोपीच्या पाठीमागे फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हे लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीपासून होते, तो काल त्याच्या घरी आला होता. त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पोलीस हवालदार नितीन चतुरे, अमोल जगदाळे, तात्या कदम, नवनाथ दडस यांनी केलेली आहे.
No comments