धुळदेव येथे भावाने भावास लोखंडी किटली मारून केले जखमी
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१७ - बँकेचा हप्ता व लाईट बिल का भरले नाही? असे विचारल्याच्या कारणावरून चिडून जाऊन एका भावाने दुसऱ्या भावास लोखंडी किटली डोक्यात मारून जखमी केल्याची घटना धुळदेव ता.फलटण येथे घडली आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेले माहितीनुसार दिनांक १६/६/२०२४ रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास धुळदेव ता. फलटण जि. सातारा येथे भाऊ ईश्वर आनंदा ठोंबरे वय १९ वर्षे हा दारू पिवून घरी आला होता, त्यावेळी हणमंत आनंदा ठोंबरे यांनी, मोटारसायकलचा बँकेचा कर्जाचा हप्ता व लाईट बील का भरले नाही असे विचारल्यावरून, ईश्वर याने चिडून जावून घरातील पाण्याची लोखंडी किटली हणमंत याच्या डोक्यात मारली व त्यास रक्तबंबाळ करून जखमी केले व शिवीगाळ केली असल्याची फिर्याद हनुमंत आनंदा ठोंबरे यांनी दिली आहे अधिक तपास पोलीस हवालदार शेंडगे हे करीत आहेत.
No comments