माजी उपनागराध्यक्षांची घरफोडी ; २३ हजार रुपयांचा ऐवज लंपास
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२३ - माजी उपनगराध्यक्षा स्वातीआशिष अहिवळे यांच्या लक्ष्मीनगर फलटण येथील बंद घराच्या टेरेसवर चढून, तेथील खिडकीचे गज कापून, घरात प्रवेश करून घरफोडी करत, घरातील रोख रक्कम व चांदीच्या वस्तू असा एकूण २३ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.09/06/2024 रोजी सायंकाळी 4.00 वा ते दि.12/06/2024 रोजी सकाळी 11.00 वाजण्याच्या दरम्यान, अज्ञात चोरट्याने, माजी उपनगराध्यक्ष स्वाती आशिष अहिवळे यांच्या जलमंदिर शेजारी, लक्ष्मीनगर फलटण येथील घराच्या टेरेसवर, चढून तेथील खिडकीचे गज कापुन, घरात प्रवेश करून, घरफोडी केली. घरातील १० हजार रुपये किंमताचा सँमसंग कंपनीचा मोबाईल फोन, ३ हजार रूपये रोख रक्कम, १० हजर रूपये किंमतीच्या दोन चांदीचे निरंजन व एक चांदीची समई असा एकूण २३ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला असल्याची फिर्याद स्वाती आशिष अहिवळे यांनी दिनांक 22 जून रोजी दिली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार पुनम वाघ या करीत आहेत.
No comments